Postpartum_002

प्रसूतीनंतरचे वजन

मातृत्व/ आईपण हे जितके सुखद असते तितके स्त्री च्या शरिरावर परीणाम करणारे असते. गर्भवस्थेनंतर स्त्रीच्या शरीरात खूप बदल होतात , यातले काही बदल चांगले असतात पण काही बदलाचां स्त्रीच्या शरीरावर खूप मोठा परिणाम होता. याचं कारण स्त्रीवर तो छोटा जीव अवलंबून असल्याने स्त्री पूर्ण प्राथमिकता त्या बाळाला देते. भारतीय स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त आहे कारण बाळ आणि त्यानंतर घरचे इतर सर्व यांना प्राथमिकता देण्याची नादात ती स्वतः च्या शरीराकडे, खाणपाना पूर्ण दुर्लक्ष करते. त्यामुळे त्यांचां परिणाम म्हणून तीच वजन असामान्य पद्धतीने वाढू लागते, तिच्या पोट आणि कमरेवर चरबी वाढू लागते आणि ती वाढलेली चरबी इतकी जिद्दी असते की ती कमी करण कठीण होऊन बसते.

बऱ्याच स्त्रिया हेच आपल आयुष्य आहे आणि आपल्याला कायम असच बेढव शरीर आणि हे वजनवाढीचे दुष्परिणाम भोगत आयुष्य जगावे लागणारं हे मान्य करून जीवन जगतात. पण तुमच्या आहारात योग्य पद्धतीने केलेले बदल तुमच्या शरीरात बरेच सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. आणि तुमच्या शरीरात झालेले ते सकारात्मक बदल तुमच्या मानसिकतेत वागण्या बोलण्यात जाणवतात. हेचं बदल तुमच्या मुलाच्या जडण घडणीत अप्रत्यक्षरीत्या बरेच सकारात्मक परीणाम करत असते.

बाळंतपणात वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम
लठ्ठपणा
थायरॉईड
पीसीओडी
पिसिओस
गुडघेदुखी
आळस वाटणे
उत्साह नसणे

तुम्ही एक निरोगी आयुष्य जगाला तर अर्थात तुमच्या बाळाच्या जडणघडणीवर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. या अश्याच निरोगी आयुष्यासाठी कोणत्या टॅब्लेट, पावडर, शेक, महागडे अन्नपदार्थ न घेता रोजच्या वापरातील योग्य ते अन्नपदार्थ योग्य त्या प्रमाणात घेऊन एक हेल्दी आयुष्य जगुया

अधिक माहितीसाठी संपर्क:- 96372 70090