Age:- 42
Job :- Housewife
Target Achieved(Till Date) of Weight Loss:- 15Kg (75 Kg To 60 Kg)
Feedback given Facebook Group :-
#SuperPositiveReview
#WeightlossReview
नमस्कार 🙏..
मी सारिका निषाद कोंडे राहणार शनिवारपेठ पुणे. मी पहिल्यांदाच याठिकाणी काहीतरी लिहित आहे, त्यामुळे कुठुन सुरवात करावी हे कळत नाहीय. माझे वय वर्ष 42 आहे आणि माझ्या लग्नाला 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला 21 वर्षांची मुलगी आणि 19 वर्षांचा मुलगा आहे. मी एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे. माझी उंची 4ft 7in आहे. लग्नावेळी माझे वजन 50 किलो होतं. माझ्या दोन्ही मुलांवेळी माझं सिजर झालं होतं आणि त्यानंतर कुटुंब नियोजनाच operation ही झालं होतं. हळूहळू माझं वजन वाढत गेलं, गेल्या 23 वर्षात ते इतकं वाढलं की मला जिने चढायला, उतरायला त्रास होऊ लागला. आधीच माझी उंची कमी आणि उंचीच्या मानाने वजन खूपच जास्त झालं होत. जवळपास 73 ते 75 किलो वर वजन गेल्यावर मला त्याची जाणीव झाली. मला खुपच थकवा जाणवू लागला आणि कोणतेही काम करायला पूर्वीसारखा उत्साह राहिला नव्हता. वाढत्या वजनाचे दुष्परिणामही हळूहळू दिसायला लागले होते. मला #Thyroid चा त्रास सुरू झाला होता, काही दिवसातच माझ्या गर्भाशयात पण गाठ आली, त्यामुळे गर्भाशयाची शस्त्रक्रिया करावी लागली. Operation नंतर तर माझं वजन ,चरबी झपाट्याने वाढू लागली. मला तर काही कळेना काय करावं.जो तो भेटायला यायचा ते सर्वजण माझ्या वजनाविषयी बोलू लागले. वेगवेगळे सल्ले देऊ लागले.बोलू लागले वजन कमी कर. गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर वजन वाढतं पण मला काही कळेना वजन कमी कसं करावे. दिवसातून एकदा जेवायला सुरुवात केली. पण या उपासमारीने पण वजन काही कमी होईना. मी रोज #5km चालायला सुरुवात केली. काही दिवस #जिम पण लावली, #Herbal_Powders पण try करून झाल्या, पण कोणत्याच उपायांनी माझं वजन कमी होत नव्हतं.. दुसऱ्या बाजूने शरीराचे एक एक त्रास वाढतच होते. एवढया कमी उंचीला एवढं जास्त वजन घेऊन फिरण मला खूप त्रासदायक होत होतं.. मग शेवटी एका क्षणाला मला पटलं की #सिजर_2, #कुटुंबनियोजनाची_शस्त्रक्रिया, #थायरॉईड, आणि #गर्भाशय काढले, शरीरावर #एवढ्या_सर्व_शस्त्रक्रिया झाल्यावर आपलं वजन असंच वाढत राहणार आणि आयुष्यभर हे असं दुखणं घेऊनच जगायचं हा नकारात्मक विचार करून मी माझ्या मनाची समजूत घातली. एवढे 4 -4 ऑपरेशन झाल्यानंतर आपलं वजन काही कमी होणार नाही. आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही, हेच वजन घेऊन जगायचं आणि ते अजुन वाढत असताना फक्त पाहत राहण्याशिवाय आणि आयुष्यभर हा त्रास सहन करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही, अस वाटत असतानाच मला अस वाटलं की देवाने माझी हाक कुठूनतरी ऐकली, आणि त्यालाही माझ्या परिस्थितीची दया आली असावी, कारण मला Reshma Jadhav यांची माहिती मिळाली. ती ही मुंबईतुन..
कसं आहे ना….काखेत कळसा आणि गावाला वळसा….. मी पुण्यात शनिवार पेठेत आणि रेश्मा मॅडम च ऑफिस पिंपरी चिंचवड मध्ये पण मला माहिती शेकडो किलोमीटरवर दुरवरून मुंबईतुन मिळाली. माझे मिस्टर श्री. निषाद रमेश कोंडे हे पुणे शहर पोलीस मध्ये आहेत, त्यांचे काही बालमित्र हेही पोलीस मध्येच आहेत.. त्यातील एक #PSI_HARISHCHANDRA_THOMBARE जे सध्या #Mumbai_Police मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी रेश्मा मॅडम कडून pure veg डाएट प्लॅन घेतला त्यांचं वजन #95किलो वरून #84किलो पर्यंत आलं होतं, तेही #1महिना मध्ये आणि पुढच्या अजून अर्धा महिना मध्ये अजून 5किलो वजन कमी झालं, त्यांचं टोटल #15किलो वजन जवळपास दीड दोन महिन्यात कमी झालं होतं, तेही कोणतेही Herbal, Ayurvedic, Protein पावडर न वापरता फक्त रोजच्या #HomeMadeFood आणि काही #HomeWorkout मधून. मला तर आधी विश्वास नाही बसला, की फक्त रोजच्या घरगुती डाएट प्लॅन मधून आणि घरीच व्यायाम करून एवढा फरक कसा पडू शकतो.. पण त्यांना फरक पडल्यामुळे त्यांचा मुलगा #Omkar_Thombare यानेही #Nutritionist + Fitness Coach Reshma Jadhav यांच्याकडून प्लॅन घेतला, त्याचेही #3week मध्ये #7kg_loss झाले होते, त्यांच्या वहिनी #Vidya_Thombare हिचेही 2 महिन्यात #10kg_loss झाले होते, तसेच त्यांचे अजून एक मित्र #PSI_RAVINDRA_SHINGTE .. यांची दोन मुले #Vishal_Shingate याचे 6 महिन्यात 117kg to 87kg असे जवळपास #30kg loss झाले होते, मुलगी #Aishwarya_Shingate हिचे #15kg_loss, आणि मिस्टरांची बालमैत्रिण #Shalan_Jagatap हिचे #12kg_loss आणि तिची मुलगी Tanya Jagtap हिचे 10kg loss झाले होते.. डोळ्यासमोर एवढे सर्व refrence असताना मलाही पुन्हा एकदा माझ्या वजनाविषयी आशा निर्माण झाली होती. वाढत्या वजनामुळे नकारात्मक भावनेत असताना सर्वांकडून एक नाव आशेचा किरण म्हणून दिसत होत तो म्हणजे, None other than Reshma Jadhav.
मग मी ही त्याना संपर्क साधायच ठरवलं.. तरीही माझ्या मनात धाकधूक ही होती की गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात मी व्यायामाला सुरवात करु शकेन का नाही? केला तर काही त्रास होईल का? माझ्या डॉ नि मला हलका व्यायाम करायला परवानगी दिली होती. Reshma Jadhav मॅम ने मला काही घरगुती व्यायाम सांगितले आणि डाएट प्लॅन दिला, आणि मला त्या व्यायाम आणि डाएट प्लॅन ने काहीही त्रास झाला नाही. मला त्यांच्यामध्ये सर्वात जास्त हे आवडलं की त्यांचं #Friendly बोलणं, आणि #Down_to_earth असणं.. कुठेही त्यांच्या वागण्या बोलण्यात बडेजावपणाचा आव नाही, अगदी आत्मीयतेने त्या आपलं म्हणणं ऐकून घेतात आणि आपल्याला होणारा त्रास प्रामाणिकपणे त्यांच काम करून कमी करण्याचा प्रयत्न करतात. एकदा डाएट आणि exercise प्लॅन देऊन सोडून दिलं, अस होत नाही त्यांच्याबाबतीत प्रत्येक 8-8 दिवसानी फॉलो अप घेणं, #PersonalAttention देणं. जर आपल्याला डाएट करण्याचा कंटाळा आला कधी demotivate झालो तर सतत #,Motivation देण्याचं काम त्यांनी केलं, अजूनही करत आहेत. मी जेव्हा डाएट प्लॅन सुरू केला तेव्हा आमच्या शेजारी , नातेवाईक कितीतरी लोकांनी डाएट करू नको, अशक्तपणा येतो वगैरे अस सर्व सांगून demotivate करण्याचा प्रयत्न केला. पण डाएट सुरू केल्यानंतरचा माझा अनुभव याचा अगदी विरुद्ध होता कारण मला मिळणार जेवण हे घरातीलच होत. कोणताही फॅन्सी डाएट नव्हता. आम्ही नॉनव्हेज जास्त खातो, तर रेशमा मॅम ने मला चिकन, अंडी, फिश अस माझ्या आवडत्या पदार्थां मध्ये डाएट बनवून दिलं, आणि ते मी खरोखर एन्जॉय करत खाल्लं, अजूनही करते आहे. कुठेही उपाशी राहण्याची यात गरज नव्हती उलट जे दिलं आहे तेच डाएट मला संपायच नाही. माझ्या मैत्रिणी म्हणायचंय “अग तू एवढं सर्व खाते आहेस, वजन नक्की कमी करायचं आहे की वाढवायचं आहे..?” पण त्यांना कुठे माहीत होतं रेश्मा मॅडम नी दिलेलं डाएट मी नुसतं “करत” नव्हते “एन्जॉय करत” होते. त्यामुळे माझ्याकडुन ते खाल्लं गेलं आणि व्यायामही केला जात होता. मी प्रत्येक 8-8 दिवसाला फॉलो अप देत होते. प्रत्येक आठवड्यात माझं वजन थोडं तरी कमी होतच होत. वजनाचा काटा जसा हळूहळू मागे सरकत होता, तसा माझा कॉन्फिडन्स वाढत होता. प्रत्येक वीक ला रेशमा मॅम माझे results मला दाखवून द्यायच्या. माझे 4-4 operation झाल्यामुळे अगदी इतरांसारख वेगात वजन कमी होईल ही अपेक्षा नव्हतीच ठेवली मी, पण तरीही रेशमा मॅम ने माझ्यावर घेतलेले efforts वेळोवेळी दिलेले motivation, weight लॉक झाल्यावर ते पुन्हा कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन.
रेश्मा मॅडम च्या प्रयत्नांमुळे मुळे आज 6 महिन्यात माझं वजन 73किलो वरून 60किलो वर आलं आहे. रेश्मा मॅडम च्या इतर क्लायंट चे result पाहता १२ किलो वजन कमी करण्यासाठी इतरांना अगदी एक दीड महिना ही पुरेसा होता. पण माझं अधून मधून काही कार्यक्रमानिमित्त गावी जाणं व्हायचं. त्यामुळे डाएट ब्रेक होत होत.. मे मध्ये तर महिनाभर गावी राहिल्याने महिनाभर “डाएट ब्रेक” झाला पण तरीही पुन्हा येऊन जेव्हा माझं वजन केलं ते जैसे थे राहत होतं. मग पुन्हा जोमाने डाएट, exercise सुरू केलं आणि आज माझं वजन 60किलो आहे, माझं वजन कमी झाल्याने माझ्या मुलीने नुकताच मला हा टी शर्ट आणि जीन्स गिफ्ट केला. साडीवरून जीन्स पर्यंत हा प्रवास आला याच श्रेय पूर्णपणे रेशमा मॅडमचच आहे. माझ्यातला हा बदल पाहून माझं मन आता उडू उडू उडू झालंय. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझ्यात एवढा बदल या वयात आणि शरीरावर एवढे सर्व प्रयोग झाल्यावर घडून येईल. रेश्मा मॅडम नी माझं वजनच कमी केलं नाहीय तर एक वेगळा आत्मविश्वासही दिलाय. काही महिन्यांपूर्वी मी स्वतः ला म्हातारी आपलं कसं होणार याबाबत समजावत होती आणि आज स्वतःला रोमॅंटीक गाण्यांवर झुलताना पाहतेय. अगदी घरातूनच नातेवाईकांकडून तर अगोदरची बेडौल “सैराट ची आर्ची” वरून आत्ताची सुडौल “आर्ची” दिसतेस ही कंमेंट ऐकायला मिळालीय. आता हे वजन येत्या दिवाळीपर्यंत 60 वरून 50 वर आलं पाहिजे हा आत्मविश्वास ही मला रेश्मा मॅम ने दिला आहे, आणि त्यादृष्टीने माझी वाटचाल ही सुरू झाली आहे, Thank you Reshma mam, Thank you Fitness Naturo Thank you so much…
तुमच्यामुळे आमच्यासारख्या जाड बायकांना आत्मविश्वास आणि प्रोत्साहन मिळते. तुमच्या motivation मुळे diet and exercise वेळेवर होते, यापुढेही तुमच्या साथीने पुढचा 10 किलो चा डोंगर मी सहज पार करेन असा विश्वास वाटतो. मी कायम तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या या ग्रेट कामासाठी तुम्हाला शुभेच्छा देईन, आणि माझे फिटनेस गुरू आणि मार्गदर्शक म्हणून गुरुपौर्णिमेच्या तुम्हला खूप खूप शुभेच्छा..💐🙏 आणि स्वामी चरणी प्रार्थना करते की माझ्यासारख्या निराश झालेल्या अनेक बायकांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलविण्याचे सामर्थ्य आणि भाग्य तुम्हास मिळो.. Fitness Naturo 😊🙏❤️